पोटच्या मुलीने आईची हत्या करून शरीराचे केले पाच तुकडे

खुनाच्या आरोपाखाली रिंपल जैन ला अटक करण्यात आले आहे

Mar 16, 2023 - 11:19
Apr 2, 2023 - 15:26
 0  125
पोटच्या मुलीने आईची हत्या करून शरीराचे केले पाच तुकडे
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

मुंबई : लालबाग परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काळाचौकी येथे इब्राहिम कासम इमारतीत राहणार्‍या २२ वर्षीय रिंपल जैन या मुलीने तिच्या ५५ वर्षीय आई वीणा प्रकाश जैन यांची हत्या केली.

 पोलिसांनी या प्रकरणी रिंपलला अटक केली आहे. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता व चाकू जप्त केला असून आरोपी मुलीने या धारदार शस्त्राच्या मदतीने शरीराचे पाच तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून तिच्याच घरातील कपाटात व लोखंडी पाणीच्या टाकीत ठेवले होते.

मंगळवारी वीणा जैन यांच्या भावाची मुले दरमहिन्याच्या खर्चासाठी पैसे देण्यासाठी इब्राहिम कासम चाळीतील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी विना जैन यांची मुलगी रिंपल ही दरवाजा उघडत नसल्याने वीणा यांच्या मोठ्या भावाची पत्नी व दुसर्‍या भावाची पत्नी राहत्या घरी मुलांसह आल्या. त्यावेळी भावाच्या मुलाने दरवाजावर जोरदार धक्का देऊन दरवाजा उघडला. मागील काही महिने वीणा यांचा भाऊ तिच्या खर्चाचे पैसे चाळीच्या खाली येऊन देत असे. मात्र या महिन्यात भावाची मुलगी पैसे देण्यासाठी गेली असता रिंपलने दरवाजा उघडला नाही. वीणा यांच्या भावजयांना संशय आल्यानंतर त्यांनी याची माहिती पतीला दिली. वीणा जैन यांचा थोरला भाऊ सुरेशकुमार हा रिंपलसह काळाचौकी पोविस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यास आले. मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर ताबडतोब काळाचौकी पोलिसांचे पथक इब्राहिम कासम चाळीतील घरी पोहोचले त्यावेळी रिंपलने आई कानपूरला गेल्याचे सांगत बनाव रचला.

royal-telecom
royal-telecom

आरोपी रिंपलने आपली आई वीणा जैन 27 डिसेंबर रोजी घराबाहेर असलेल्या शौचालयाजवळ असलेल्या गॅलरीतून खाली पडली असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला उचलण्यासाठी रिंपलने खाली असलेल्या हॉटेलमधील दोन कामगारांची मदत घेतली. या दोन कामगारांची देखील पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे पोलिसांचा असा अंदाज आहे की, 27 डिसेंबरला वीणा जैन यांची हत्या करण्यात आली असून त्यानंतर तिचे तुकडे करून घरात ठेवण्यात आले होते.

पोलिसांना लोखंडी कपाटाच्या तळघरात विना जैन यांच्या मृतदेहाचा एक भाग कूजलेल्या अवस्थेत एका प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला. त्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यानंतर बाथरूममध्ये स्टीलच्या टाकीत साडीत गुंडाळलेले वीणा याच्या शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व भाग एकत्र करून केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.


royal telecom

royal telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom