भिवधानोरा येथे परप्रांतिय कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड

तर मोटरसायकल चोरटयास शिताफिने केले जेरबंद. गंगापुर पोलीसांची कारवाई

Jan 20, 2024 - 18:47
Jan 20, 2024 - 19:10
 0  139
भिवधानोरा येथे परप्रांतिय कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

गंगापूर: पोलीस ठाणे गंगापुर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी तक्रारदार दिनेश रुमसिंग कश्यप वय 38 वर्षे रा. पिपलीया गर्ड, ता. सेंधवा जि.बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता. गंगापुर यांनी तक्रार दिली कि, ते भिवधानोरा येथील शेतवस्तीवर शेतमजुर म्हणुन कामाला असुन दिनांक १८/०१/२०२४ रोजी भिवधानोरा येथिल आठवडा बाजार असल्याने सायंकाळी ०६:3० वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेलो होतो. यावेळी मालकाने त्यांचा पगार म्हणुन त्यांना २०,००० रुपये दिलेले त्यांचे जवळच होते. रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास बराच अंधार झालेला असल्याने बाजार करून शेतवस्तीवर परत जात असतांना भिवधानोरा गावाचे अलिकडे दोन व्यक्‍ती या भरधाव वेगात माझ्याजवळ आले व माझ्या हाताला धरून मला बळजबरीने ओढत शेतात नेले, मी बराच आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्‍तींनी त्याच्या जवळ असलेला चाकुचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी देवुन बाजार करून उरलेले माझ्या खिशातील १७,००० रूपये रोख व मोबाईल फोन असा एकुण २६,०००/- रुपये किंमतीचा माल बळजबरीने चोरून नेला. या तक्रारीवरून पोलीस ठाणे गंगापुर येथे दिनांक १९/०१/२०२४ रोजी कलम 3९४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे सुचना नुसार नमुद गुन्हयाचा तपास पो.नि. सत्यजीत ताईतवाले हे

royal-telecom
royal-telecom

करिता असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि नमुद गुन्हा हा भिवधानोरा व पखोरा येथील राहणारे दोन व्यक्‍तींनी केला आहे. यावरुन गंगापुर पोलीसांची दोन वेगवेगळी पथके तयार करून पो.नि. ताईतवाले यांचे पथकांने पखोरा येथील शेतवस्तीवर संशयीत ईसमाचा शोध घेतला असता तो एका पडित गायरान जमिनीतील झाडाचे आडोशाला लपुन बसला होता. पोलीसांनी शेताच्या परिसरात सापळा लावुन अत्यंत शिताफिने हालचाल न होवु देता आरोपी हा गाफिल असतांना त्याचेवर अचानक झडप घालुन त्याला ताब्यात घेतले यावेळी त्याला त्याचे नावा गाव विचारता त्यांने त्याचे नाव सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर असे सांगितले यावेळी त्याला गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता तो पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवुन लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांन सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे रामेश्वर बाळासाहेब चव्हाण यांचे सोबतीने केल्याचे कबुल केले. यावरून लगेच श्री प्रमोद काळे, पो.उप.नि यांचे पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवधानोरा येथील स्मशान भुमीच्या परिसरात लपुन बसलेल्या दुसरा आरोपीच्या अत्यंत शिताफिने मुसक्या आवळुन त्यांना जेरबंद केले आहे. त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील 3०००/- रुपये रोख व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व नमुद गुन्हयात १) सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर २) रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय ३० वर्षे रा. भिवधानोरा यांना अटक करण्यात आली आहे.

याचप्रमाणे पो.नि. सत्यजीत ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला पो.स्टे, गंगापुर येथे घेवुन जात असतांना मोटरसायकल वरिल एक ईसम हा पोलीसांना बघुन अत्यंत भरधाव वेगात सुसाट निघाला यावेळी त्याचेवर संशय बळावल्याने त्याचा ०१ किमी पेक्षा अधिक पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीजवळ थांबवुन विचारपुस करता तो पोलीसांना घाबरुन उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याची कसोशिने विचारपुस करता त्यांने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय २७ वर्षे रा, शहापुर घोडेगाव असे सांगुन तो चालवित असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस काळया रंगाची क्रमांक एम.एच, २० डी.पी, ७४०४ ही त्याने बकलवालनगर, वाळुज, छत्रपती संभाजीनगर येथुन दिनांक ७४/७४/२०२० रोजी चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावरून गंगापूर पोलीसांचे सतर्कतेमुळे पो.स्टे. वाळुज , छत्रपती संभाजीनगर येथील गुरनं १०७/२०२० कलम ३७९ भादंवी हा सुध्दा उघडकीस आणला असुन नमुद गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक एम.एच. २० डी.पी. ७४०४ ही जप्त करण्यात आरोपी सुरेश वाल्मिक घाणे वय २४ वर्षे रा. शहापुर घोडेगाव यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, मा. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली श्री सत्यजींत ताईतवाले, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद काळे, पो.उप.नि. पोलीस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी केली आहे.


royal telecom

royal telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom