कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगापूर तहसील कार्यालयात कंत्राटी पद्धतीच्या विरोधात निवेदन

गंगापूर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

Sep 19, 2023 - 02:56
Oct 5, 2023 - 12:49
 0  131
कंत्राटी पद्धतीच्या विरोधात देशव्यापी लढा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगापूर तहसील कार्यालयात कंत्राटी पद्धतीच्या विरोधात निवेदन
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

गंगापूर : नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शासनाने कंत्राटी रोजगार भरतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे. ज्ञात असावे कि मोठ्या संख्येने शहरी तसेच ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे सध्या वळलेले आहेत. भरमसाठ परीक्षा शुल्क, पेपरफुटी भरती घोटाळा असे अनेक प्रश्‍न समोर असताना हा शासन निर्णय विद्यार्थ्यावर अन्याय आहे. स्पर्धा परीक्षेत स्पर्धा भयानक वाढलेली आहे आणि अशात हा जलमी आदेश त्यांचे भविष्य अंधारात ढकलू पाहत आहे. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर याचा निषेध नोंदवला  जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे हे आंदोलन फक्त निषेधात्मक आहे. जर शासनाने याची दखल घेऊन आपल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयात सुधारणा केली नाही तर राष्ट्रवादी पार्टी तर्फे आणखीन तीव्र स्वरूपाच्या आंदोलन उभे होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. 

अनेक वर्षांपासून शासकीय पदभरती होत नसल्याने लाखो तरुण बेरोजगारीच्या झळा सोसत आहेत. त्यात राज्य शासनाने थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या कक्षा आणखी रुंदावल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

असल्या अनेक मुद्दे विचारात घेऊन गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे गंगापूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गंगापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील निळ, गंगापूर युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर गवांदे, आशू शेख, जुनेद पटेल, अहमद पटेल, गणेश शिंदे, सचिन खाजेकर, शेख मकसुद तसेच राईटपोस्ट चे संपादक जमीर शेख आणि इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

royal-telecom
royal-telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom