सैराट स्टाईलची पुनरावृत्ती, दहेगाव बंगला परिसरातील घटना

कुऱ्हाडीने सपासप वार करून रस्त्यातच जल्लोष

Dec 29, 2022 - 23:19
Oct 8, 2023 - 12:58
 0  399
सैराट स्टाईलची पुनरावृत्ती, दहेगाव बंगला परिसरातील घटना
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

दहेगाव बंगला, 29 डिसेंबर :  औरंगाबाद-पुणे महामार्गावर भर दिवसा युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मेहुण्याची हत्या केली आहे. दहेगाव बंगल्याजवळ इसारवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे.

विशेष म्हणजे औरंगाबाद पुणे ह्या वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा झालेल्या सैराट चित्रपटाच्या पुनरावृत्ती झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कुऱ्हाडीने सपासप वार केल्यानंतरही हा आरोपी थांबला नाही. खून केल्यानंतर त्याने रस्त्यावर जल्लोष केला आणि मग तो मोटर सायकलवरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाळूज पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, ए.एस.आय. दिलवाले,ए.एस.आय ढोले यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलीस पंचनामा केला असुन रात्री उशिरपर्यंत गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे. बापु छब्बू खिल्लारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

royal-telecom
royal-telecom

काही वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीचं लग्न झालं होतं, यानंतर तिचा घटस्फोट होऊन ती दुसरीकडे नांदत होती. याआधीही त्यांच्यात भांडणं झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीने बहिणीला खोकर भोकर येथून पळवून नेल्याच्या रागातून आपल्याच भाऊजीची हत्या केल्याचं समोर येत आहे. औरंगाबाद शहरातली ही दिवसभरातली दुसरी घटना आहे, त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

बातमी देण्यासाठी व जाहिराती साठी संपर्क करा. rightpost24x7@gmail.com / 9834985191 ➖➖➖➖➖➖➖ ???? ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील ???? व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom