रहीमपूर/अब्दूलपूर या गावांमध्ये ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती होणार स्थापन

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणेची जबाबदारी

Feb 11, 2023 - 20:55
Feb 11, 2023 - 21:10
 0  62
रहीमपूर/अब्दूलपूर  या गावांमध्ये ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती होणार स्थापन
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

लिंबे जळगाव : ग्रामीण स्तरावर विविध पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल करण्यासाठी, दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी तसेच पाण्याच्या शुद्धीकरणाची गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ नुसार या समितीची रचना करण्यात आली. या समितीला 'ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती' किंवा 'ग्राम आरोग्य समिती' किंवा 'ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती' अशीही नावे आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व पोषण इत्यादी विषय 'ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती' च्या नियंत्रणात येतात.

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती

ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ नुसार बनलेली प्रकल्पातील प्रमुख समिती आहे. प्रकल्पाची आखणी, नियोजन, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती करणेची जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची आहे. तसेच या समितीचे नवीन नामकरण ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती असे आहे.

royal-telecom
royal-telecom

समितीची रचना

१) अध्यक्ष व सचिव यांची निवड व समितीची निवड ग्रामसभेमधून केली जाईल.
२) पाणी पुरवठा व स्वच्छता या समितीमध्ये किमान १२ सदस्य व जास्तीत जास्त २४ सदस्य असतील.
३) त्यामधिल १/३ सदस्य ग्रामपंचायत सदस्यातून निवडलेले असतिल.
४) या समितीत ५० टक्के महिला सदस्यांचा समावेश असेल.
५) गावपातळीवरील महिला मंडळ, युवा मंडळ, भजनी मंडळ, महिला बचतगट सहकारी संस्था इ. प्रतिनिधी असतिल.
६) ग्रामस्तरीय शासकीय/जि.प. ग्रामपंचायत/कर्मचारी आमंत्रीत व सहकारी सदस्य म्हणून निवड करता येईल पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.
७) ३० टक्के मागासवर्गीय असतील.
८) प्रत्येक वॉर्ड किवा वस्तीतील किमान १ प्रतिनिधी सदस्य म्हणून असतील.


royal telecom

royal telecom

ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी:

ग्राम पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता समितीने आपल्या गावातील सुशिक्षित व काम करण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीची निवड करुन त्याची ग्राम पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यासाठी ग्राम पंचायतीकडे शिफारस केली जाते. (ग्रामपंचायत कर्मचारी निवड प्रक्रिया).

पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीस योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टोने ग्राम पंचायतीस मार्गदशन करण्याची जबाबदारी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता सामतीची असते.

ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्राम पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची कामाची जबादारी आणि आपली कर्तव्ये वेळेवर आणि नीटपणे पार पाडतो आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवावे लागते.

ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा कर्मचारी व्यक्तीचे मानधन/पगार जमा झालेल्या पाणीपट्टीतून दिले जाते. (Pani Purvatha Karmchari).

ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी कर्तव्य व कामे:

गावात पिण्याचे पाणी पुरेसे आहे किंवा नाही याची नोंद ठेवण्याची जबादारी ग्राम पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची असते.

गावात नळपाणी पुरवठा असल्यास, 

१. पाणी वेळवर सोडणे व सर्व वाडया, वस्त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल याची खात्री करणे. 

२. नळपाणी पुरवठा यंत्रणेत निर्माण झालेल्या किरकोळ बिघाडाची दुरुस्ती करणे.

३. दररोज ओ.टी. चाचणी घेणे. (पाण्याची शुद्धता तपासणे). ओ.टो. साठी पाणी नमुना गावातील प्रत्येक भागातील, वाड्या, वस्तींमधील शेवटच्या नळापासून घ्यावयास सुरुवात करुन पुढील काही नळांच्या पाण्याची ओ.टी.चाचणी करावी व निष्कर्ष नोंदवहीत लिहणे.

४. ओ.टी. निगेटिव्ह असल्यास पाणी नमुना घेवून एफ.एफ.सी. चाचणीसाठी पाठविणे, आणि ओ.टी. निगेटिव्ह असल्याची माहिती ग्राम पाणी पुरवठा समितीस देणे.

गावात पाणी पुरवठा विहिरी व हातपंप असल्यास,

१. सर्व पिण्याच्या पाण्याच्या विहरीच्या पाण्यात टी.सी.एल. योग्य प्रमाणात टाकावे. 

२. पिण्याच्या पाण्याच्या सर्व विहिरीच्या पाण्याची ओ.टी. चाचणी दररोज घ्यावी व निष्कर्षाची नोंद नोंदवहीत लिहावी.

३. ओ.टी. निगेटिव्ह असल्यास पाणी नमुना घेऊन एफ एफ.सी. चाचणीसाठी पाठविणे व त्यांची नोंद नोंदवहीत लिहावी. त्यानंतर लगेचच त्या विहिरीत टी.सी एल. टाकून पाणी निर्जंतूक करावे. 

४. पिण्याच्या पाण्याच्या भोवतालचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. 

५. पाणी पट्टी वसूलीस ग्रामसेवकास मदत करावी. 

६. प्रत्येक महिन्यात केलेल्या कामाचा मासिक अवहाल  विहित नमुन्यात ग्रामसेवकास दयावा.

ग्रामपंचायत सार्वजनिक विहिरी:

ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक विहिरीच्या बाबतीत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता सामतीने खालील नमूद बाबींबाबत ग्रामपंचायतीस मार्गदशन व मदत करावी. 

१. सार्वजनिक विहिरीतील गाळ दोन वर्षातून किमान एकदा तरी उपसण्यात यावा.

२. सार्वजनिक विहिरीत पोहावयास किंवा अन्य कारणांसाठी काणोही व्यक्ती उतरुन पाणी घाण / अशुध्द होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

३. सार्वजनिक विहिरीच्या परिसरात कपडे धुणे, भांडी घासणे, आंघोळ करणे. जनावरे धुणे, मलमुत्र विसर्जन, इत्यादी कामे तसेच विहीरीवर झाडाच्या फांद्या आल्यामुळे विहिरीत पालापाचोळा किंवा पक्ष्यांची विष्ठा पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. खताचे खड्डे / सार्वजनिक-खाजगी संडास, विहिरीच्या लगतच्या परिसरात अस्तित्वात नसावेत.

५. सार्वजनिक विहिरींच्या पडझड झाल्यास तो पूर्वव्रत  सुस्थितीत रहाण्याच्या दृष्टोने प्राम पंचायतीमार्फत कार्यवाही  करण्यात यावी.

ग्रामपंचायत हातपंप/वीजपंप:

ग्रामपंचायत हद्दीतील विविध विहिरीवर बसविण्यात आलेल्या हातपंप/विद्युतपंपाबाबत समितीने खाली निर्देशित बाबींची दक्षता घेण्यासाठी ग्रामपंचायतीला मार्गदर्शन व मदत करावी. 

१. हातापंपाच्या दांड्याशी अथवा वीजपंपाच्या नळ कोंडयाळयाशी गावातील मुले खेळून त्याची मोडतोड होत नाही याची दक्षता घेण्यात यावी.

२. विंधन विहिरीसाठी बांधण्याल आलेल्या ओटयांवर कपडे धुतले जाऊ नयेत तसेच, सदर ओटे फुटलेल्या स्थितीत नसावेत.

३. विंधन विहिरीच्या आजूबाजूस साठणाऱ्या पाण्यास वाट काढून ते दूरवर सोडून देण्यात यावेत, ते परिसरात साचून मुरत नाही. तसेच, विंधण विहिरीच्या परिसरात खताचे खड्डे /सार्वजनिक अथवा खासगी संडास नाहीत याची दक्षता घ्यावी.

४. हातपंप/वीजपंप नादुरुस्त झाल्यास, त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात यावी.

५. हातपंप/वीजपंपासाठी विहित केलेली वर्गणी ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक वर्षाच्या मार्च महिन्यात १५ तारखेपर्यंत जिल्हा परिषदेकडे भरली जावी. 

ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजना:

नळ पाणी पुरवठा योजना ही गावातील ग्रामस्थानां पाणी पुरवठयासाठी सुरू करण्यात आलेली उपाययोजना आहे. त्याबाबत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने या उपाययोजनेच्या बाबतीत काळजीपूर्वक खाली निर्देशित मागदर्शन व मदत करावी. 

१. गावातील उंचावरील टाकी व जमिनीवरील टाकीची जागा तसेच, गावात बसविण्यात थेणाऱ्या मळकोंडाळाची जागा नळ योजनेच्या संबंधीत अभियंत्याच्या मदतीने / मागदर्शन ग्रामस्थांची सोय होईल अशा रितीने निश्‍चित करावी.

२. गावातील नळ योजनेच्या वितरण नलिका विहिर खोलीवर गावातील सांडपाण्याच्या गटारापासून सुरक्षित अंतरावर टाकण्यात याव्यात.

३. नळांची मोडतोड होणार नाही, अथवा मोडतोड झाल्यास, ते वेळोवेळी दुरुस्त करण्यात यावेत.

४. नळातून पाणी वाहून ते वाया जात नाही किंवा नळाच्या सभोवताली परिसरात साचून राहणार नाही, ज्यामुळे गावात डास, माशा इत्यादींचा उपद्रव वाढून साथरोगांचा प्रादुर्भाव  होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

५. नळांच्या पाण्याच्या बागा शिंपणे, जनावरे धुणे इत्यादी प्रकारे गैरवापर करण्यात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

६. ज्या गावामध्ये ग्राम पाणी पुरवठा कर्मचारी नियुक्ती झालेली नाही अशा गावात ग्राम पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची  नियुक्ती होईपर्यंत ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या शिपायाकडून ग्राम पाणी पुरवठा कर्मचारीची कामे करुन घेण्यात यावी.

७. ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्‌भव निश्‍चित नाहीत अशा ठिकाणी पाणी शुध्दीकरणासाठी घरोघरी  क्लोरीन गोळया किंवा द्रव क्लोरीन पुरवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची राहील. 

पाणी पुरवठा योजनेचे आर्थिक व्यवस्थापन:

ज्या ग्रामपंचायती, ग्रामस्थांकडुन वेळच्यावेळी पाणीपट्टी वसूल करत नाहीत आणि पाणीपट्टीद्वारे प्राप्त झालेला पैसा बहुतेक वेळा इतर कामांसाठी वापरला जातो यावर आळा घालण्यासाठी पाणी पुरवठा योजनेचे आर्थिक व्यवस्थापन होणं गरजेचं आहे.

१. गावातील पाणी वितरण व्यवस्थेची संपुण जबाबदारी ग्राम पंचायतीची असून निधी अभावी पाणी वितरण व्यवस्था कालमडू नये म्हणून पाणीपट्टी द्वारे जमा झालेला निधी जमा करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने एक स्वतंत्र खाते बँकेत उघडावे. 

२. पाणी पुरवठयाच्या बाबतीत जमा झालेल्या पाणीपट्टी निधीपपैकी ८०% निधी हा जिल्हा परिषदेच्या देखभाल व दरुस्ती निधीत ड्राफ्ट किंवा चेकद्वारे भरावा. उर्वरित २०% रक्‍कम ग्राम पाणीपट्टी निधीच्या खात्यावर जमा करावे.

२. पाणीपट्टी वसूली १००% होईलयाची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी व जमा झालेला निधी हा केवळ पाणी पुरवठा योजना राबाविण्यासाठीच खर्च केला जाईल याची काळजी घ्यावी. 

३. ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने पाणी पुरवठा, देखभाल व दुरुस्तीचे साठीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते पंचायत समितीला (गटविकास अधिकारी) सादर करणे.

४. पाणी समितीचे सचिव या नात्याने ग्रामसेवकांनी पाणीपट्टीचे स्वतंत्र हिशेब ठेवावेत व पाणी समितीच्या मासिक सभेत तसेच ग्रामपंचायत सभेत मासिक खर्चाचा  अहवाल वाचून दाखवावा. 

५. जमा होत असलेल्या पाणीपट्टीत पाणी योजना राबवणे शक्‍य नसल्यास ग्राम पंचायतीने जादा निधीची मागणी पंचायत समितीला व जिल्हा परिषदेकडे करावी. सदर  मागणी योग्य आहे किंवा नाही याची पडताळणी करुन योग्य वाटल्यास निधी उपलब्ध करुन द्यावा. 

७. मुळ पाणी पुरवठा योजनाअंतर्गत समाविष्ठ असलेल्या गावामध्ये नळकोंडयातून पाणी घेणार्‍या कुटूंबासाठी तसेच वैयक्‍तीक नळधारक कुटुंबाकडून शासनाने विहीत कलेल्या पाणी पट्टीच्या किमान व कमाल दरास अधिन राहून पाणी पट्टी आकारण्यात यावी व वसूल करावी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom