वैजापूर पोलिसांची मोठी कामगिरी : ३५ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एकाला अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त

वैजापूर हडको परिसरात ११ डिसेंबरला घडलेल्या ३५ लाखांच्या घरफोडी प्रकरणी वैजापूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. चोरीचे सोने-चांदीचे दागिने, रोकड व गुन्ह्यात वापरलेली बाईक जप्त. पाहा संपूर्ण बातमी व फोटो.

दिसंबर 26, 2025 - 22:47
दिसंबर 26, 2025 - 22:53
 0  30
वैजापूर पोलिसांची मोठी कामगिरी : ३५ लाखांच्या घरफोडीप्रकरणी एकाला अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त
फोटो : वैजापूर पोलिस ठाण्यासमोर अटकेतील आरोपी, जप्त मुद्देमाल आणि पोलिस अधिकारी.
RightPost UPI QR स्कॅन करा

🙏 RightPost ला मदत करा!

न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.

UPI: stk-9834985191@okbizaxis

₹100 द्या

तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!

RightPost UPI QR स्कॅन करा

🙏 RightPost ला मदत करा!

न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.

UPI: stk-9834985191@okbizaxis

₹100 द्या

तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!

rightpost news adवैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : वैजापूर शहरातील हडको परिसरात ११ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात वैजापूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. पोलिसांच्या सततच्या तपासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून, चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

घटना ११ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली. फिर्यादी श्री. भागीनाथ तुळशीराम निघोट (वय ५०, रा. हडको परिसर, वैजापूर) हे जळगाव येथे गेले असताना त्यांच्या घरी चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाट तोडून ३५ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता (कलम ३०५ (अ), ३३१ (३) भादंविचे).

पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) डॉ. विनायकुमार मे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह मेडम यांच्या सूचनेनुसार सदर गुन्ह्याचा तपास वैजापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात सुरू होता. पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्तात्रय पवार यांच्या टीमने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.

अटकेतील आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल (सोने-चांदीचे दागिने), गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (MH 20 EP 6236) आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपी हा स्थानिक गुन्हेगार असून, त्याच्याकडून इतर प्रकरणांचाही छडा लागण्याची शक्यता आहे.

या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार, पोलीस हवालदार पोपट कोरीत, पोलीस नाईक वैजनाथ हे करीत आदींचा सहभाग होता. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

राइटपोस्ट पत्रकार भर्ती - सत्याची ज्योत उजाळा!
#Ad | स्पॉन्सर्ड
ही जाहिरात आहे | Sponsored by RightPost | IT Rules 2021 अनुपालन
राइटपोस्ट पत्रकार भर्ती - सत्याची ज्योत उजाळा!
#Ad | स्पॉन्सर्ड
ही जाहिरात आहे | Sponsored by RightPost | IT Rules 2021 अनुपालन

आपकी प्रतिक्रिया क्या है?

पसंद करें पसंद करें 0
नापसंद नापसंद 0
प्यार प्यार 0
मज़ेदार मज़ेदार 0
गुस्सा गुस्सा 0
दुखद दुखद 0
वाह वाह 0
ब्लॉगसाफ़र अॅड
ब्लॉगसाफ़र अॅड