आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; वाळूज पोलिसांत तक्रार
आमदार प्रशांत बंब यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या अमरावतीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदकुमार गांधीले पाटील यांनी केली आहे. वाचा सविस्तर बातमी.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करून 'काळे फासण्याची' भाषा करणाऱ्या अमरावती येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. नंदकुमार गांधीले पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले.
काय आहे प्रकरण?
आमदार प्रशांत बंब यांनी नुकतेच शिक्षक टी.ई.टी. (TET) संदर्भात आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले होते. "सुमारे ७० टक्के शिक्षक लाडावलेले आहेत आणि कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे," अशी भूमिका बंब यांनी मांडली होती. या वक्तव्याचा निषेध करताना अमरावती येथील चंद्रशेखर म. भोयर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून आमदार बंब यांना काळे फासण्याचे बेताल वक्तव्य केले होते.
निवेदनातील मागणी:
या निवेदनात म्हटले आहे की, आमदार बंब हे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या या भूमिकेला आमचे पूर्ण समर्थन आहे. मात्र, विधायक काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला धमकावणे आणि काळे फासण्याची भाषा करणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी आमदार बंब यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुराव्याखातर संबंधित व्हिडिओची पेन ड्राईव्ह देखील पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
उपस्थित पदाधिकारी:
हे निवेदन देताना नंदकुमार गांधीले पाटील यांच्यासह अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अमजद पटेल, जिल्हा उपाध्यक्ष हाशम पटेल, अल्पसंख्याक वाळूज शहर अध्यक्ष सैय्यद शाकेर सौदागर, सचिन मूढे, जावेद पटेल, तैय्यब शेख, रवी मनगटे, धीरज साकला आणि प्रविण साकला आदी उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0


