लिंबे जळगाव ते औरंगाबाद शहर बस सेवा अखेर सुरू; वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला मोठे यश
लिंबे जळगाव ते औरंगाबाद शहर बस सेवा सुरू! वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) पाठपुराव्याला मोठे यश. ज्येष्ठ नागरिक रामेश्वर पाटील गवळी यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ. प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सविस्तर वाचा.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
औरंगाबाद: लिंबे जळगाव आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लिंबे जळगाव ते औरंगाबाद शहर ही थेट बस सेवा आजपासून सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.
या नवीन बस सेवेचा शुभारंभ आज उत्साहात करण्यात आला. लिंबे जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामेश्वर पाटील गवळी यांच्या हस्ते पहिल्या शहर बसचे विधिवत पूजन करून सेवेला सुरुवात झाली.
लिंबे जळगाव येथून औरंगाबाद शहरात कामासाठी, शिक्षणासाठी आणि इतर कारणांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही बस सेवा सुरू करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने ही सेवा सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे व्हाइस चेअरमन शेख जहीर शेख यासीन, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निरफळ, हरिश पटेल, शेषराव जाधव, राजू निरफळ उपस्थित होते. तसेच, सामाजिक कार्यकर्ते हबीब पटेल, राम जेऊघाले, रफीक सुलेमान शेख, महसुद भाई, संतोष पादर, किशोर पादर, शुभम कुरहाडे, रमेश बोरुडे, अरबास मौलाना, मुस्ताक इब्राण पठाण, मुस्ताक मौलाना, शेख रहीम, जाधव अब्दलपुर, शेख राजू कबीर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर यांनी दिली.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0

