भाजपच्या अल्पसंख्याक गंगापूर कार्यकारणीची घोषणा, अमजद कासम पटेल यांच्या नेतृत्वात नवीन टीम
भाजप गंगापूर अल्पसंख्याक आघाडीची नवीन कार्यकारणी २ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर. तालुका अध्यक्ष अमजद कासम पटेल यांच्या नेतृत्वात २७ सदस्यांची टीम स्थापन. उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस व सदस्यांची यादी प्रसिद्ध. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक समाजात पक्षवाढीचा निर्धार.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
गंगापूर, ता. २ नोव्हेंबर २०२५ : भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) गंगापूर विभागात अल्पसंख्याक आघाडीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष अमजद कासम पटेल यांच्या नेतृत्वात ही टीम कार्यरत राहणार असून, पक्षाला अल्पसंख्याक समाजात मजबूत आधार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
भाजपचे तालुका अध्यक्ष अमजद कासम पटेल यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण, ओबीसी कल्याण मंत्री मा. अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस मा. संजयजी केणेकर, गंगापुरचे आमदार प्रशांत बंब साहेब, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. किशोरजी धनायत, जिल्हा अध्यक्ष मा. संजयजी खांबायते, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अजीम मणियार, सरचिटणीस सौ. ज्योतीताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे.
पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टी नव्या भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. पक्षाची कार्यकर्ते संवेदनशील असून, त्यांच्या अविभाजित कष्टामुळे पक्ष आज नवी उंची गाठत आहे. मला खात्री आहे की, नवनिर्वाचित सहकारी व भाजपचे सर्व कार्यकर्ते पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील आणि सर्वांच्या सहकार्याने सोबतीने येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकांसाठी आम्ही सज्ज राहू. तसेच पक्ष वाढीसाठी आपण आपले पूर्ण योगदान द्याल या अपेक्षेसह पुढील वाटचालीस सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अल्पसंख्याक कार्यकारणी सदस्य
गंगापूर
| अ.क्र. | पद | नाव | गाव/ठिकाण |
|---|---|---|---|
| 1 | ता. अध्यक्ष | अमजद कासम पटेल | वाळूज |
| 2 | ता. उपाध्यक्ष | ऐनुस आबेद बिन हिलाल्बी | शेंदुरवादा |
| 3 | ता. उपाध्यक्ष | जाकिर उस्मान पठाण | सावखेडा |
| 4 | ता. उपाध्यक्ष | मोसीन करीम शेख | गंगापूर |
| 5 | ता. उपाध्यक्ष | राजू रसूल गुलाम शेख | लिंबेजलगाव |
| 6 | ता. उपाध्यक्ष | आसिफ अली शेख | अगरवाडगाव |
| 7 | सचिव | सोहेल पटेल | रहिमपूर |
| 8 | सचिव | समीर रेहमान पटेल | जिकठाण |
| 9 | सचिव | हारिष पटेल | लिंबेजलगाव |
| 10 | सचिव | मुजीब जाफर सय्यद | नंद्राबाद |
| 11 | सरचिटणीस | अथर जवरी | गंगापूर |
| 12 | सरचिटणीस | गणी रेहमान पटेल | जिकठाण |
| 13 | सरचिटणीस | मुस्ताक मेहबुद पटेल | जामगाव |
| 14 | कोषाध्यक्ष | जमील शेख | दहेगांव बंगला |
| 15 | सदस्य | आरेफ शेख | वाळूज |
| 16 | सदस्य | नजीर याकुब शेख | जिकठाण |
| 17 | सदस्य | अन्वर पटेल | सालेगांव |
| 18 | सदस्य | फेरोज नवाब पठाण | नंद्राबाद |
| 19 | सदस्य | ईनुस शेख | पेंढापुर |
| 20 | सदस्य | शाहरुख रफीक पटेल | जामगाव |
| 21 | सदस्य | कलीम सलीम शेख | ढोरगांव |
| 22 | सदस्य | अनिस पटेल | पुरी |
| 23 | सदस्य | अब्दुल रेहमान शेख | ढोरगांव |
| 24 | सदस्य | लतीफ भाई | शेंदुरवादा |
| 25 | सदस्य | इलियास इसाक शेख | सावखेडा |
| 26 | सदस्य | मेहबूब हबीब शेख | होरिगाव |
| 27 | सदस्य | आरीफ पटेल | पेंढापुर |
या कार्यकारणीच्या माध्यमातून भाजप अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या स्थानिक पातळीवर मजबुतीसाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सुरेश शिंदे
तालुका अध्यक्ष, गंगापूर
अमजद कासम पटेल
तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक गंगापूर
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
1
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
1

