प्रसिद्ध पत्रकार आणि 'राईटपोस्ट'चे संपादक जमीर शेख यांचा 'वंचित बहुजन आघाडी'त जाहीर प्रवेश!
राईट पोस्ट'चे मालक आणि पत्रकार जमीर शेख यांनी आज वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. मा. अरुंधती ताई सिरसाठ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. वाचा सविस्तर बातमी.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
वंचित बहुजन आघाडीचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असून, आज विविध क्षेत्रातील मान्यवर पक्षात सक्रिय होत आहेत. याच शृंखलेत आज, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी, 'राईटपोस्ट' (RightPost) चे मालक/संपादक, प्रकाशक आणि प्रसिद्ध पत्रकार जमीर शेख यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी मा. अरुंधती ताई सिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी अरुंधती ताईंनी जमीर शेख यांचे पक्षात स्वागत केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे आणि जिल्हा महासचिव प्रविण हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिक्रिया:
"बाळासाहेब आंबेडकरांचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध असेन. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडत असतानाच आता राजकीय मंचावरूनही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढा देईन," अशी भावना यावेळी जमीर शेख यांनी व्यक्त केली.
पत्रकार जमीर शेख यांच्या प्रवेशाने पक्षाची माध्यम आणि जनसंपर्क आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
1
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0


