रहीमपूर (खडक) डीपी बदलली रे.. बदलली की जळते.!

रहीमपूर (खडक) ग्रामस्थ काहीं महिन्यापासून अंधारात

Dec 12, 2022 - 20:18
Oct 5, 2023 - 13:27
 0  77
रहीमपूर (खडक) डीपी बदलली रे.. बदलली की जळते.!
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले
rahimpur dp

royal telecom

royal telecom

रहीमपूर : राईटपोस्ट वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथील गावठाणसाठी असणारी डीपी (ट्रान्सफार्मर) दोन-तीन वेळा बदलूनही पुन्हा जळत आहे. डीपी जळाल्याने पहिल्यांदा नवीन डीपी आणून बसविण्यात आली..तीही जळाली. यानंतर पुन्हा काही दिवसांनी डीपी बसविण्यात आली, तीही काही तासातच जळाली…म्हजणे परिसरातील घरांमध्ये पुन्हा अंधार! दोन ते तिनवेळा डीपी बसवूनही ती जळत असेल, तर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होतो. यामुळे नागरिकांना गेल्या सहा दिवसांपासून अंधारात जीवन जगण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने येथे लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राईटपोस्ट चे संपादक जमीर अमीर शेख यांच्यासह साबेर पठाण, फेरोज शेख, आरेफ शरीफ शेख, शारुख शरीफ  शेख, फारुख मुसा शेख इत्यादि नागरिकांनी केली.

रहीमपूर येथील गावठाणसाठी असणारी डिपी एका दिवसापूर्वी जळाली आहे. नवीन डिपी ही काही तासातच जळाली. पुन्हा येथे दुसरी डीपी बसवण्यात आली; मात्र हेही काही वेळातच जळाली. बसविलेला डीपी तत्काळ नादुरुस्त होतो कसी? असा प्रश्न नागरिकांना पडला असून, डीपी व्यवस्थित भरून दिली जाते की, नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. येथील नागरिकांचे जनजीवन विजे आभावी विस्कळीत झाले आहे.रहीमपूर येथील गावठाणची डीपी तत्काळ बदलून येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

royal-telecom
royal-telecom

 सध्या काही दिवसांपूर्वीच पावसाळा संपल्याने गावात जागोजागी गवत उगवले असून, घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित असल्याने मोठी भर पडली असून, संपूर्ण गंगापूर तालुक्यात वीजेच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ग्राहक मोठे त्रस्त आहेत.


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom