खुलताबाद शहरातील अवैधरित्या शस्त्र साठा जप्त; पाच जणांना अटक
खुलताबाद येथे स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रसाठा जप्त करून पाच जणांना अटक केली. कारवाईत देशी पिस्तूल, तलवारी आणि कोयता हस्तगत. गुन्हेगारी कृत्यांसाठी शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता. आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल, तपास सुरू.

प्रतिनिधी – खुलताबाद शहरातील विविध भागांमध्ये अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चार धारधार तलवारी आणि एक कोयता असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 10 जुलै रोजी रात्री कारवाई सुरू केली.
गोपनीय माहितीवरून वडकेआली मोहल्ला, सईदानिमा मोहल्ला, गुलावशहा कॉलनी, साळीवाडा वाजारगल्ली आणि कुरेशी मोहल्ला या परिसरात संशयित व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली. रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत पुढील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
1. मोहमंद अल्तमश मोहमंद फईम (वय 25),
2. मोहमंद मृजाहिद निसार कुरेशी (वय 24),
3. फलक शहा नासेर शहा (वय 22),
4. फईजान शहा अख्दुल शहा (वय 26),
5. अजमत खान अजीज खान (वय 25).
यातील पहिल्या चार आरोपींनी तलवारी व कोयता लपवून ठेवल्याचे उघड झाले. दरम्यान, अजमत खान याच्याकडे गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा लावून त्याला अटक केली. चौकशीत त्याने हे शस्त्र मंडप डेकोरेटरच्या सामानात लपवून ठेवल्याची कबुली दिली.
सर्व आरोपींविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये (कलम 3, 4, 25) गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिपक पारधे, पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम पटेल, प्रमोद पाटील, सचिन राठोड आणि शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.