आंबेवाडी ता गंगापूर येथील महिला बौद्ध सरपंच यांचा मतांचा अधिकार नाकारणार्या विरोधात तात्काळ कारवाई करा 

वंचित बहुजन आघाडीची मागणी

Dec 5, 2023 - 21:57
Dec 6, 2023 - 08:02
 0  112
आंबेवाडी ता गंगापूर येथील महिला बौद्ध सरपंच यांचा मतांचा अधिकार नाकारणार्या विरोधात तात्काळ कारवाई करा 
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद: गंगापूर तालुक्यातील मौजे आंबेवाडी खोजेवाडी गृप ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती महिला साठी राखीव होते त्या ठिकाणी बौद्ध महिला जनतेतून निवडून आल्या आहेत परंतु त्यांचा अध्यक्षतेखाली उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात आली उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी तथा  मंडळ अधिकारी बेडवाल यांनी नवनिर्वाचित बौद्ध महिला सरपंच यांना जातीय देषातून मतदानाचा अधिकार नाकारला जनतेतून निवडून आलेल्यांना एक मतदान आणि सनसमान झाल्यावर निर्णायक मत देण्याचा अधिकार असताना संबंधित जातीयवादी निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी बेडवाल यांनी जाणीवपूर्वक जातीयवादी भावनेतून राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रकार केला असून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायतींची उपसरपंच पदांची निवडणूक रद्द करुन फेर निवडणूक घेण्यात यावी सहा दिवसांपासून आंबेगाव येथे आमरण उपोषणाला बसलेल्या महिला सरपंच यांची प्रकृती चिंताजनक असूनही तालूक्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांनी साधी भेट दिली नाही यावरून हा सगळा गैरप्रकार राजकीय हस्तक्षेपामुळे तालूक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितल्या प्रमाणे बेडलाल यांनी केला आहे असा वंचित बहुजन आघाडीचा स्पष्ट आरोप आहे.

वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने  महिला सरपंच यांचे उपोषण तात्काळ सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार तात्काळ कारवाई करावी व त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करावे सदरील सरपंच ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ( बौध्द)असून त्यांचा जीवाचे बरेवाईट झाल्यास याला सर्वस्वी तहसीलदार जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे  तहसीलदार म्हणून निवडणूक आणि निवडणूक अधिकारी बेडवाल हे दोन्ही विषय तहसीलदार यांच्या आख्तारित येतात आणि तहसीलदार हे त्यांना पाठीशी घालत असल्यामुळेच एका महिला सरपंचाला आपल्या अधिकारासाठी सहा दिवस उपोषणाला बसावे लागते आहे हि गंभीर बाब असून तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना घेरावा घालण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, युवा तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ,महिला तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते, तालुका संघटक शांतावन उबाळे,अमृत डोगरदिवे,महिला तालुका उपाध्यक्ष सुमनबाई बनकर, युवा ता उपाध्यक्ष किरण किर्तीशाही, सय्यद इस्माईल भाई, वाळूज जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष दिलीप आरक, नानासाहेब महांकाळ,योगेश सकपाळ,प्रमोद पतंगे,सर्कल अध्यक्ष विशाल खाडे, शहराध्यक्ष हुसेन पठाण, अक्षय वाघमारे, विक्रम तुपे,सोहिल शेख,आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

royal-telecom
royal-telecom

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom