तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी वंचित बहुजन आघाडीची तहसीलदार यांच्याकडे मागणी

पक्षी आणि जलचर प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकणारे आहे हे प्रकल्प असे अनेकांचे मत

Dec 12, 2023 - 08:25
 0  52
तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी वंचित बहुजन आघाडीची तहसीलदार यांच्याकडे मागणी
राइटपोस्ट की खबरे अपनों से शेयर करना न भूले

royal telecom

royal telecom

rightpost news ad

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील धरणावर प्रस्तावितरण ते सौर ऊर्जा प्रकल्प चा घाट घातल्या जात आहे आम्ही या निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो की जायकवाडी जलाशयाचे पूर्ण क्षेत्र संजय पातळीपर्यंत पक्षी अभयारण्य घोषित झालेले आहे तसेच यापुढील पाचशे मीटर अंतरापर्यंत क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत समाविष्ट झालेले आहे त्या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभारता येत नाही कोणतेही बांधकाम करता येत नाही पक्षी अधिवासास त्रासदायक होतील अशा बाबी करण्यास कायद्याने बंदी आहे जैवविविधतेवर बागा आणणारे प्रकल्प अशा क्षेत्रात उभारता येत नाही प्रस्तावित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे अच्छादनामुळे पाण्यातील जलचरास ऑक्सिजन मिळणार नाही पाणी प्रदूषित होईल पाण्यातील वनस्पती वाढणार नाही वनसंपदेवर परिणाम होऊ शकतो पक्षी आणि पाण्यातील मासे आणि इतर जलचर साखळीवर परिणाम होऊन मासे आणि पक्षी अभयारण्य असूनही मरण पावतील जायकवाडी जलाशयावर अनेकांचा रोजगार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे संबंधितांवरही उपासमारीची वेळ येऊ शकते प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प हा अनधिकृत आणि शासनाचे नियमना पायदळी तोडण्याबरोबरच वन्यजीव संरक्षण कायद्यास नजरेआड करणारा आहे संबंधित विषयाबाबत मासेमारी करणारे आणि पक्षीप्रेमी मित्रांनी महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध कार्यालयांना त्याबाबत निवेदन दिलेले आहेत सदरील प्रकल्प स्थगित व्हावा यासाठी समस्त मच्छिमार बांधवांच्या वतीने पक्षी प्रेमी पर्यटन प्रेमी यांच्यावतीने विरोध करण्यात येत आहे मुळात स्थानिक नागरिकांच्या पारंपारिक व्यवसायास बाधा येईल व त्यांना जीवन जगण्यास अडथळा येईल असे प्रकल्प शासनाने करूच नये भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे सदरील प्रकल्पामुळे त्यांचा पारंपारिक व्यवसाय नष्ट होऊन त्यांना उपासमार होऊ शकते म्हणून वंचित बहुजन आघाडी या प्रकल्पास तीव्र विरोध करत आहे व स्थानिक नागरिक तसेच पर्यावरण प्रेमी नागरिक व जैवविविधता टिकून राहावी यासाठी काम करणारे शास्त्रज्ञ यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तात्काळ हा प्रकल्प रद्द करावा नसता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असेही शेवटी तहसीलदार यांना शिष्टमंडळाने भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल, रामेश्वर दाणे, बाबासाहेब शेजवळ, वंचित महिला आघाडीच्या निर्मला शेजवळ, गोदावरी नदीवर मासेमारी करणारे लाभार्थी सर्वश्री शामराज पल्हारे, शांतीलाल पल्हारे, बाळासाहेब रासणे, मच्छिंद्र परमेश्वर, हिरालाल पल्हारे, भाऊसाहेब मोरे, अविनाश गायकवाड,फकिरचंद जाधव,कुष्णा पल्हारे,रमेश बिरुटे, भाऊसाहेब गायकवाड, नवनाथ पंडूरे, बाळू गायकवाड, गणेश कुलभ्यया, रविंद्र गगुले, महेश कंदे,आकाश पल्हारे , नानासाहेब मोरे, हरिभाऊ बर्डे आदिंचा शिष्टमंडळात समावेश होता.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

royal-telecom
royal-telecom

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad


royal telecom

royal telecom

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow

RightPost Officials आप अपना लेख, न्यूज़, मजमून, ग्राउंड रिपोर्ट और प्रेस रिलीज़ हमें भेज सकते हैं Email: rightpost24x7@gmail.com या Whatapp 9834985191
royal-telecom
royal-telecom