"पाऊस कोसळतोय, शेतकरी रडतोय... सरकार ऐकणार का?
अतिवृष्टीची मदत नाही, आता अवकाळीने उरलेलंही हिरावलं! मुसळधार, ५०० हेक्टर मका-कापूस-तूर उद्ध्वस्त. अतिवृष्टी मदत शून्य, मराठवाडा अपडेट.
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
गंगापूर तालुक्यातील रहीमपूर गाव आज पाण्याच्या तडाख्यात सापडलं. गेल्या ४८ तासांत सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. जुलैमध्ये दुष्काळाने जळालेली पिके, आता अवकाळी मुसळधाराने वाहून गेली. मका, कापूस, तूर – १००% उद्ध्वस्त. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसा मदत नाही!
रहीमपूरच्या शेतात उभे राहिले की फक्त पाणी, गाळ आणि निराशा दिसते. हारून शेख (३७) यांच्या २ एकर मक्याच्या शेतात आज सकाळी पाणी तुडुंब. कापणीसाठी दोन दिवस उरले होते.
"जुलैमध्ये पाऊस नव्हता, अर्धे पिके सुकली. आता कापणीला आलेली पिके पाण्यात गेली. अतिवृष्टी जाहीर झाली, पंचनामा झाला, पण पैसा आला नाही. कर्ज कसं फेडणार? मुलांचं शिक्षण कसं करणार? आम्ही रस्त्यावर उतरू!"
– हारून शेख, शेतकरी बाजूला गंडे पाटील (४८) यांचं कापूस शेत. पांढरा कापूस आता गाळाने माखलेला.
"१ एकर कापूस, १ एकर तूर – सगळं संपलं. बँकेत लाख कर्ज. घरात लग्न. ५० हजार हेक्टरी तरी द्या, नाहीतर आत्महत्या करावी लागेल!"
– गंडे पाटील, शेतकरी तुर्काबाद, खराडी, अब्दुलपूर, लिंबे जळगाव, जिकठान – सर्व गावांचं चित्र एकच. शेतात कुजलेल्या , खराब झालेल्या पिकांपैकी काहीच वाचलं नाही. जमीन नापीक, गाळ साचला, रब्बी हंगामाची तयारीही धोक्यात.
शेतकऱ्यांचा विश्वास उडाला. "आमचे पंचनामे कागदावरच राहिले!" असं गावकरी म्हणतात.
मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात. सरकार कधी जागं होणार?
शेतकऱ्यांचा हंबरडा : "उरलं तेही संपलं!"
सरकारची उदासीनता : मदत कुठे?
राजकीय खडाजंगी : आंदोलनाची हाक!
शेतकऱ्यांच्या मागण्या : आता तरी ऐकणार का?
पुढे काय?.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0



