“आमची शाळा, आमची जबाबदारी” – रहीमपूरच्या माजी विद्यार्थ्यांचा कारखानदारांना साकडे
गळक्या खोल्यांतून मोठे झालेले माजी विद्यार्थी परतले आपल्या शाळेकडे! जमीर शेख, सोहेल शेख, उमर पटेल यांच्या नेतृत्वात कारखानदारांना CSR साठी थेट अर्ज. रहीमपूरची ही मोहीम यशस्वी होणार?
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
स्कॅन करा
🙏 RightPost ला मदत करा!
न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.
UPI:
stk-9834985191@okbizaxis
तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!
रहीमपूर, ता. २२ नोव्हेंबर २०२५
रहीमपूर (ता. गंगापुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मूलभूत सुविधांचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खराब, स्वच्छतागृहांची दुरावस्था, खोल्या गळक्या, खिडक्या-दारे मोडकळीस, खेळाचे मैदान असमर्थ अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकवृंद एकत्र आले आहेत.
आज सकाळी शाळेच्या मुख्याध्यापक हारून शेख सर, सहशिक्षक सत्तार शेख सर आणि माजी विद्यार्थी यांनी गावाच्या हद्दीत असलेल्या विविध कारखान्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मदतीसाठी लेखी अर्ज सादर केले. या पुढाकाराला गावातील मान्यवरांनी सक्रिय साथ दिली.
या विनंती मोहिमेत विशेष सहभाग घेतलेले मान्यवर:
- राईटपोस्ट दैनिकाचे मुख्य संपादक जमीर शेख
- किसान एजन्सीचे मालक सोहेल शेख
- पटेल मेडिकलचे मालक उमर पटेल
- समाजसेवक समीर पठाण
- गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक गुलाबास शेख
या सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून कारखानदारांना शाळेच्या दयनीय अवस्थेची जाणीव करून दिली आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत मदत करण्याचे आवाहन केले. कारखानदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच मदतीबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
मुख्याध्यापक हारून शेख सर म्हणाले,
“आमच्या शाळेतील १५० हून अधिक मुले आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावातील कारखाने समृद्ध होत आहेत, त्यामुळे त्यांनीही गावाच्या शाळेला हातभार लावावा, हीच अपेक्षा आहे. आज माजी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट पाहून खूप बरे वाटले.”
माजी विद्यार्थी व किसान एजन्सीचे मालक सोहेल शेख यांनी सांगितले,
“आम्ही ज्या शाळेत शिकून मोठे झालो, ती शाळा आजही तीच अवस्थेत आहे. आम्ही सर्वजण मिळून तिला नवे आयुष्य देऊया, असा निर्धार आहे.”
राईटपोस्टचे संपादक जमीर शेख म्हणाले,
“मुलांना चांगली शाळा मिळाली पाहिजे हाच खरा विकास
“मी (जमीर शेख) स्वतः या शाळेत शिकलो आहे. तेव्हा पण पाणी-स्वच्छतागृहाची समस्या होती, आजही आहे. आता गावात मोठे-मोठे कारखाने उभे राहिले आहेत, पण शाळा मात्र तिथेच आहे. हा विकास नाही. खरा विकास म्हणजे या कारखान्यांच्या छायेत ही शाळा आधुनिक व्हावी, मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. आजची ही मोहीम याचसाठी आहे.”
माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला तर काहीही शक्य आहे
“आज सोहेल, उमर, समीर, मी(जमीर शेख) सगळे जण एकत्र आलो, कारण आम्हाला आमच्या शाळेची काळजी आहे. आम्ही पत्रकार, व्यापारी, समाजसेवक आहोत, पण आधी या शाळेचे विद्यार्थी आहोत. माजी विद्यार्थ्यांनी एकदा ठामपणे पुढे आलं की कारखानदारही नकार देऊ शकत नाहीत. ही एकजूटच आमचा मोठा विजय आहे.”
CSR फक्त कागदावर नको, गावाच्या मातीत उतरली पाहिजे
“प्रत्येक कारखान्याला CSR साठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. पण ते पैसे दूरच्या शहरात, परजिल्ह्यात जातात. आज आम्ही कारखानदारांना सांगितलं – तुमचा कारखाना ज्या गावात उभा आहे, त्या गावच्या शाळेला प्रथम मदत करा. तुम्ही इथले पाणी, इथली वीज, इथली रस्ते वापरता, आता इथल्या मुलांचे भविष्य घडवायला हातभार लावा. त्यांना आमचा मुद्दा पटला आहे.”
रहीमपूरची ही मोहीम संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरेल
“रहीमपूरने आज दाखवून दिलं की गावकरी, माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजक एकत्र आले तर शासकीय योजनांशिवायही शाळा बदलता येतात. ही मोहीम यशस्वी झाली तर परिसरातील इतर गावांनाही प्रेरणा मिळेल. राईटपोस्ट या बातमीला सातत्याने प्रसिद्धी देणार आहे, कारण ही फक्त एका शाळेची नाही, संपूर्ण ग्रामीण शिक्षणाची लढाई आहे.”
आम्ही थांबणार नाही, मदत मिळेपर्यंत लढू
“आज अर्ज दिला, उद्या आठवड्याने फॉलोअप करू, नंतर पुन्हा भेटू. कारखानदारांनी होकार दिला तरी आम्ही काम पूर्ण होईपर्यंत मागे लागू. ही शाळा आमची आहे, तिला आम्ही दुखात सोडणार नाही.”
गावकऱ्यांमध्ये या मोहिमेबद्दल प्रचंड उत्साह आहे. लवकरच कारखान्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास रहीमपूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या सुविधा लवकरच सुधारतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
(रिपोर्ट : जमीर शेख, रहीमपूर)
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0

