रामदास आठवले यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त खुलताबादमध्ये फळवाटप कार्यक्रम
- RightPost की खास रिपोर्ट (Exclusive Report).
- यह खबर जनता के सरोकार से जुड़ी है.
- पूरी खबर नीचे विस्तार से पढ़ें.
Join RightPost WhatsApp
Get latest news on phone!
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त खुलताबाद तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात रुग्णांना आणि आदिवासी बांधवांना फळांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच मुंडी टेकडी येथील आदिवासी पारधी समाजातील बांधवांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे रुग्ण आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास रिपाई जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव, तालुका सरचिटणीस भाऊराव गवळे, तालुका सहसल्लागार गजानन वाकळे, शहर अध्यक्ष अण्णा जाधव, शहर उपाध्यक्ष मिलिंद जाधव, शहर सचिव विकास बनकर, वेरूळ सर्कल प्रमुख मधुकर गायकवाड, बोरगाव सर्कल प्रमुख वाल्मीक ढिवर, रफिक पठाण, डॉ. वैशाली बोधनकर, कीर्ती पाषाण आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयातील आधी परिचारिका कोमल दुधे, विशाल मगर (कक्षसेवक), कांताबाई वाघ, संगीता पिसे (कक्षसेवक), सुरक्षारक्षक रावसाहेब तळेकर यांच्यासह रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0
अली भाई शेख
खुलताबाद/ग्रामीण प्रतिनिधी


स्कॅन करा





अपनी टिप्पणी छोड़ें...