नारायणपूर (बु.) येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम

नारायणपूर (बु.) येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी. फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि पुष्पार्पण कार्यक्रम. सरपंच नासेर पटेल, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित.

अक्टूबर 15, 2025 - 14:18
 0
नारायणपूर (बु.) येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम
ब्लॉगसाफ़र अॅड
ब्लॉगसाफ़र अॅड

rightpost news adनारायणपूर (बु.), दि. १५ ऑक्टोबर २०२५: येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न, माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आदर्श ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच नासेर पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रमही राबवण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी घारमोडे साहेब, उपसरपंच मजित प., समिती अध्यक्ष ईरफान पटेल, उपाध्यक्ष तय्यब इब्राहिम, शालेय मुख्याध्यापिका शकिला नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक खरात, पोलिस पाटील ताजु प., चेअरमन सबजर प., राजु प., हानिफ प., वजिर पठान, आन्सार पठान, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिराज रज्जाक शेख, समिती सदस्य आशपाक प., सोनू सेठ, सिराज हाशम प., गुलाब साहेब, आनिस प., इजाज सबजर प., छगन मुळे, शारुख प., तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. शालेय विद्यार्थ्यांनीही यावेळी आपल्या भाषणातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून डॉ. कलाम यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन फाउंडेशनच्या सदस्यांनी यशस्वीपणे पार पाडले. 

हा कार्यक्रम गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा ठरला असून, डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला.

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

ब्लॉगसाफ़र अॅड
ब्लॉगसाफ़र अॅड